‘बिग बॉस १७’ची स्पर्धक मन्नारा चोप्रा या शोमध्ये आल्यापासून तिची बहीण मिताली चोप्रा देखील चर्चेत आली आहे. मिताली चोप्रा ‘फॅमिली वीक’ दरम्यान या शोमध्ये देखील दिसली होती.
या शोमध्ये आल्यापासून मितालीच्या क्यूटनेसचे चाहते खूप कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून यूजर्स मिताली ही चोप्रा बहिणींमध्ये सर्वात क्यूट असल्याच्या कमेंट करत आहेत.
मिताली चोप्रा मन्नारापेक्षा वयाने लहान असली, तरी मन्नारापेक्षा ती अधिक शांत आणि परिपक्व दिसते. जेव्हा तिने या घरात एन्ट्री घेतली तेव्हा, या शोमध्ये आली तेव्हा ती मन्नाराला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगताना दिसली.
मिताली चोप्रा हिचा स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय आहे. तिचा स्वतःचा हिऱ्यांचा ब्रँड आहे, जो आता जगभरात विस्तार करत आहे.
स्वतः मिताली चोप्राने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मन्नारा वयाने मोठी असली, तरी तिच्यात खूप बालिशपणा आहे. जेव्हा आम्हाला कळले की, मन्नारा या शोमध्ये जाणार आहे, तेव्हा आम्ही सर्वजण काळजीत पडलो. कारण ती खूप साधी आहे.'