happy birthday Bhuvneshwar Kumar : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्मलेल्या भुवीला किंग ऑफ स्विंग म्हणूनही ओळखले जाते. भुवनेश्वर कुमारने आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच असे अनेक पराक्रम केले आहेत, ज्याची सर्वत्र चर्चा झाली. यानंतर त्याला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. येथेही तो तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज ठरला.
(1 / 7)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने सचिन तेंडुलकरला शुन्यावर बाद केले होते. २००८-०९ रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचा सामना उत्तर प्रदेशशी झाला. या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर सचिन शुन्यावर तंबूत परतला. हा सामना यूपीने गमावला पण भुवी रातोरात प्रसिद्ध झाला.
(2 / 7)
भुवनेश्वर कुमारचा जन्म ५ फेब्रुवारी १९९० रोजी मेरठमध्ये झाला. यानंतर, उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्याला २०११ मध्ये पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
(3 / 7)
त्यानंतर २०१२ च्या अखेरीस त्याला टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भुवीने ४ षटकात ९ धावा देऊन नासिर जमशेद, अहमद शहजाद आणि उमर अकमल यांची विकेट घेतली.
(4 / 7)
त्यानंतर भुवीने पाकिस्तानविरुद्धच्या वनडेमध्येही पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हाफिजला बोल्ड केले. त्याने ९ षटकांच्या स्पेलमध्ये ३ विकेट घेतल्या. त्यानंतर भुवी तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज बनला.
(5 / 7)
भुवी आपल्या स्विंगने कोणत्याही फलंदाजाला अगदी सहज अडचणीत आणू शकतो. भुवनेश्वरचा टी-20 फॉरमॅटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५ बळी घेणारा भुवनेश्वर कुमार हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला.
(6 / 7)
टी-२० फॉरमॅटमध्ये भुवीच्या नावावर अनेक विक्रम आहे. पण त्याच्या नावावर एक खास विक्रम आहे. तो म्हणजे, त्याने तब्बल १८ वेळा टी-20 मध्ये डावाच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली आहे.
(7 / 7)
भुवनेश्वर कुमारने भारतासाठी आतापर्यंत २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने टेस्टमध्ये ६३, एकदिवसीयमध्ये १४१ आणि टी-20 मध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत.