Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड्स! कोणकोणत्या बाबतीत ठरला नंबर १? जाणून घ्या…
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड्स! कोणकोणत्या बाबतीत ठरला नंबर १? जाणून घ्या…

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड्स! कोणकोणत्या बाबतीत ठरला नंबर १? जाणून घ्या…

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मोडले अनेक रेकॉर्ड्स! कोणकोणत्या बाबतीत ठरला नंबर १? जाणून घ्या…

Nov 12, 2024 03:09 PM IST
  • twitter
  • twitter
Bhool Bhulaiyaa 3 Records: कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी आणि विद्या बालनसारखे कलाकर असलेल्या 'भूल भुलैया ३’ या चित्रपटाने आतापर्यंत कोणते रेकॉर्ड मोडले आहेत, जाणून घेऊया...
दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि हा ट्रेंड अजूनही कायम आहे. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटाने आतापर्यंत कार्तिक आर्यनचे किती चित्रपट आणि कोणते रेकॉर्ड तोडले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 7)

'भूल भुलैया ३' या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन ३६ कोटी रुपये होते, जे कार्तिक आर्यन कोणत्याही चित्रपटाने रिलीजच्या दिवशी केलेले सर्वाधिक कलेक्शन आहे. याआधी ‘भूल भुलैया २’ने ११.११ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, जो आतापर्यंतचा सर्वाधिक होता.
twitterfacebook
share
(2 / 7)

या चित्रपटाच्या ओपनिंग वीकेंड कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर या बाबतीतही 'भूल भुलैया ३' पहिल्या क्रमांकावर (११०.२० कोटी) आला आहे. याआधी ‘भूल भुलैया २’ने ५५.९६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, जो आतापर्यंतचा सर्वाधिक होता.
twitterfacebook
share
(3 / 7)

या चित्रपटाच्या पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या बाबतीतही 'भूल भुलैया ३' टॉपवर आहे (१६८.८६ कोटी). कारण याआधी २०२२मध्ये रिलीज झालेल्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाची एका आठवड्याची कमाई टॉपवर होती. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९२ कोटींची कमाई केली होती.
twitterfacebook
share
(4 / 7)

चित्रपटाच्या लाइफटाईम कलेक्शनबद्दल बोलायचे तर, या प्रकरणातही ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि मनोरंजक गोष्ट म्हणजे कमाईचे आकडे सतत वाढत आहेत. त्याने कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया २’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘पती पत्नी और वो’, ‘लुका छुपी’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारख्या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शन मागे टाकले आहे.
twitterfacebook
share
(5 / 7)

भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत, ‘भूल भुलैया ३’ने आतापर्यंत ‘डंकी’, ‘भारत’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘गोलमाल अगेन’, ‘फायटर’, ‘गुड न्यूज’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या कमाईचा आलेख अजूनही चढताच आहे.
twitterfacebook
share
(6 / 7)

सर्वात जलद १०० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘भूल भुलैया ३’चे नाव देखील समाविष्ट आहे. अवघ्या ३ दिवसात १०० कोटींचा टप्पा गाठला. या बाबतीत ‘डंकी’, ‘फायटर’, ‘एक था टायगर’ आणि ‘३ इडियट्स’सारखे चित्रपट मागे पडले आहेत.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज