Bhausaheb Rangari Ganapati: पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले आहेत. मंडळाच्या वतीने यंदा 'दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय' ही सजावट करण्यात आली आहे.
(1 / 6)
पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले आहेत. मंडळाच्या वतीने यंदा 'दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय' ही सजावट करण्यात आली आहे. यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण आहे.
(2 / 6)
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. गणरायांची प्राणप्रतिष्ठापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या हस्ते झाली.
(3 / 6)
या वेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, जयंत किराड, मधुकर सणस, अॅड.प्रताप परदेशी, सूरज थोरात, विकी खन्ना उपस्थित होते.
(4 / 6)
मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात १६ हत्ती, ६० लहान मोठ्या आकाराच्या घंटा, १५ मोठे त्रिशुळ, मंडपाच्या मध्यभागी १० फूटाचा नंदी, महादेव व पार्वतीचे भव्य चित्र लक्ष वेधून घेत आहेत. कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० कुशल कारागिरांनी १ महिन्यापासून काम करून भव्य शिवालय साकारले आहे.
(5 / 6)
अण्णा थोरात म्हणाले, ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापित असते, त्याला शिवालय असे म्हटले जाते. मंडळाच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या शिवालयात आल्यावर दगडामध्ये कोरलेल्या प्राचीन मंदिरात आल्याचा अनुभव भाविकांना होणार आहे.
(6 / 6)
अतिशय बारकाईने कलाकारांनी सजावटीचे काम केले आहे. भव्य शंकराची पिंड आणि त्यावरील जलाभिषेक विशेष आकर्षण आहे, असेही थोरात म्हणाले.