Bharat Jodo Yatra in Telangana : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसनं सुरू केलेली भारत जोडो यात्रा आज तेलंगणात पोहचली आहे.
(1 / 4)
Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली सुरू झालेली भारत जोडो यात्रा केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकानंतर आज तेलंगणात दाखल झाली आहे. (twitter)
(2 / 4)
यावेळी तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातल्या गुडाबल्लूरमध्ये भारत जोडो यात्रा दाखल झाल्यानंतर तरुणांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात राहुल गांधींचं स्वागत केलं. यावेळी कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमारही उपस्थित होते.(twitter)
(3 / 4)
भारत जोडो यात्रा तेलंगणात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी तरुणांसह महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.(twitter)
(4 / 4)
यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या धार्मिक राजकारणावर जोरदार टीका केली आहे. याशिवाय महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारला लक्ष्य केलं.(twitter)