काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा आज उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत पोहोचली. तिथं पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी यात्रेत सहभाग घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व सर्वसामान्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
(PTI)भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्रीमार्गे अमरोहा, सम्भल, बुलंदशहर, अलिगढ, हाथरस आणि आग्रा मार्गे जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात काँग्रेस व इंडिया आघाडीसाठी ही यात्रा वातावरण निर्मिती करणारी ठरू शकते.
(PTI)राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी यात्रेत सहभागी झाल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. ओपन टॉप जीपवर बसून हात उंचावून राहुल आणि प्रियांका हे काँग्रेस कार्यकर्ते आणि लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होते.
(PTI)मुरादाबादच्या वेगवेगळ्या भागातून ही यात्रा पुढं जात असताना कार्यकर्ते 'राहुल गांधी जिंदाबाद, 'प्रियांका गांधी जिंदाबाद' आणि 'काँग्रेस पार्टी जिंदाबाद' अशा घोषणा देत होते. राहुल व प्रियांका दोघेही अधूनमधून लोकांशी संवाद साधत होते.
(PTI)भारत जोडो न्याय यात्रेने उत्तर प्रदेशात प्रवेश केला, तेव्हा प्रियांका गांधी चंदौलीतील यात्रेत सहभागी होणार होत्या. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळं नंतर त्या यात्रेत सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, त्या आज यात्रेत सहभागी झाल्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढवला.
(ANI)राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ इथं रोड शो केला. मुरादाबाद इथं जनतेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली. देशात पाकीटमारी सुरू आहे. नरेंद्र मोदी हे लोकांचं लक्ष विचलित करतात. अदानी, अंबानी खिसा कापतात आणि अमित शाह लाटी घेऊन लोकांना घाबरवतात, असं ते म्हणाले.
(Congress-X)