आत्मविजय - ‘जीवनात हजारो युद्धं जिंकण्याहून चांगले आहे स्वत:वर विजय प्राप्त करणे. मग विजय कायम तुमचाच असेल, हा विजय तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.’
सूर्य, चंद्र आणि सत्य- ‘कोणत्याही परिस्थितीत या तीन गोष्टी कधीही लपून राहत नाहीत- त्या गोष्टी आहेत सूर्य, चंद्र आणि सत्य.’
सनातन धर्म - ‘वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच (प्रेम) केवळ ते शांत होऊ शकते. हाच सनातन धर्म आहे’
सत्याच्या मार्गावर चालणे - ‘सत्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती फक्त दोनच चुका करू शकते, पहिली चूक संपूर्ण मार्ग न चालणे आणि दुसरी चूक चालण्याची सुरुवातच न करणे ही.’
जीवनप्रवास - ‘जीवनात एखादा उद्देश पूर्ण करणे किंवा आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तो प्रवास उत्तम प्रकारे पार पाडणे हे अधिक महत्त्वपूर्ण आहे.’
वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे - ‘भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवून जाऊ नका आणि भुतकाळातच रमू नका, तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. जीवनात आनंदी राहण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे.’
आनंद वाटल्याने वाढतो - ‘ज्या प्रकारे एका जळत्या दिव्याद्वारे हजारे दिवे लावता येतात, तरी देखील पहिल्या दिव्याचा प्रकाश जराही कमी होत नाही, त्याच प्रकारे आनंद वाटल्यानंतर वाढ, तो कधीही कमी होत नाही.’
कृती महत्त्वाची - ‘जीवनात तुम्ही कितीही चांगली चांगली पुस्तके वाचा, कितीही चांगले शब्द ऐका, मात्र जो पर्यंत तुम्ही त्याचा जीवनात उपयोग करत नाही तोपर्यंत त्याचा काहीही फायदा नाही.’
क्रोध आणि जळता निखारा - ‘नेहमी रागावलेले राहणे म्हणजे जळता निखारा एखाद्या व्यक्तीवर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात धरल्यासारखाच आहे. कारण हा क्रोध किंवा राग सर्वात आधी तुम्हालाच जाळतो.’