Dhanashree Verma And Yuzvendra Chahal Net Worth : भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होणार, अशा बातम्या समोर येत आहेत. चहल आणि धनश्री या दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.
(1 / 7)
दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांचे एकत्र असलेले फोटो डिलीट केले आहेत. यानंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे बोलले जात आहे.
(2 / 7)
चहल भारतीय संघाबाहेर असला तरी तो बराच काळ संघात राहिला आहे. याशिवाय तो आयपीएलमध्येही खेळतो आणि इथूनही भरपूर पैसे कमावतो. रिपोर्ट्सनुसार, चहलची आजपर्यंतची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये आहे.
(3 / 7)
चहल यंदा आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. त्याची एकूण संपत्ती यंदा लक्षणीय वाढणार आहे. या फ्रँचायझीने चहलसाठी १८ कोटी रुपये मोजले आहेत. याशिवाय चहल काही ब्रँडच्या जाहिरातीही करतो आणि त्यातून लाखोंची कमाईही करतो.
(4 / 7)
त्याचे गुरुग्राममध्ये एक आलिशान घरही आहे. त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्याही आहेत. चहलकडे पोर्श, मर्सिडीज बेंझ सी क्लास, रोल्स रॉयस आणि लॅम्बोर्गिनी सारख्या कार आहेत.
(5 / 7)
तर धनश्री वर्मा ही व्यवसायाने डेंटल डॉक्टर आहे. ती डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे. धनश्री वर्माचे एक यूट्यूब चॅनेलही केले, ज्याचे २.५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.
(6 / 7)
'झलक दिखला जा' या डान्सिंग रिॲलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. याशिवाय सोशल मीडियावर तिचे ६ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. कोरिओग्राफी आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ती करोडोंची कमाई करते.
(7 / 7)
धनश्री अनेक गायकांसोबत म्युझिक व्हिडिओमध्येही काम करत आहे. एका रिपोर्टनुसार, २८ वर्षीय धनश्रीची अंदाजे मालमत्ता २४ कोटी रुपये आहे.