Suspense Thriller Movies: ‘हे’ टॉप ६ मर्डर मिस्ट्री चित्रपट फक्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांच्या प्रेमींसाठी बनवले आहेत. यांचा क्लायमॅक्स असा होता की, तुम्ही स्वप्नातही याची कल्पना केली नसेल.
(1 / 7)
सस्पेन्स थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री चित्रपटांचेही वेगळे फॅन फॉलोइंग असते. कथा पाहण्यासोबतच प्रेक्षकही हे गूढ उकलण्यात गुंतून जातात. या चित्रपटांमध्ये केवळ प्रेक्षकच आश्चर्यचकित होत नाहीत, तर क्लायमॅक्सही मनाला चकित करतात. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडच्या काही अप्रतिम सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांबद्दल…
(2 / 7)
बदला: या चित्रपटाची कथा एका यशस्वी व्यावसायिकाची (तापसी पन्नू) कथा सांगते, जिच्यावर हत्येचा खोटा आरोप आहे. तिला वाचवण्यासाठी एका सुपर टॅलेंटेड वकीलाची (अमिताभ बच्चन) नियुक्ती केली जाते. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट अनोख्या ट्विस्ट आणि टर्न्सने भरलेला आहे.
(3 / 7)
कहानी: एक गर्भवती महिला (विद्या बालन) तिच्या पतीच्या शोधात कोलकात्यात येते. जसजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे धक्कादायक वास्तव तिच्या समोर येते. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा अंदाज तुम्ही कधीही लावू शकणार नाही, असे नक्कीच म्हणता येईल.
(4 / 7)
अंधाधुन: आंधळा असलेला पियानो वादक एका खुनाच्या प्रकरणात अडकतो. आता तो आंधळा आहे, पण त्याचवेळी स्वत:ला निर्दोष सिद्ध करायचा आहे, आणि हे नाटक त्याला पुढे कायम सुरू ठेवायचे आहे.
(5 / 7)
तलाश: रीमा कागतीचा २०१२मध्ये रिलीज झालेला 'तलाश' हा सुपरहिट सिनेमा होता. चित्रपटाची कथा एका पोलिस अधिकाऱ्याची आहे, जो एका कार अपघाताचा तपास करत आहे. परंतु, जेव्हा त्याच्यासमोर काही अलौकिक गोष्टी येतात, तेव्हा त्याला धक्का बसतो.
(6 / 7)
दृश्यम: स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात चौथी पास केबल ऑपरेटरच्या मुलीने तिच्या वर्गमित्राची हत्या केली. आता हा माणूस (अजय देवगण) आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. चित्रपटाच्या कथेत इतके ट्विस्ट आणि टर्न्स आहेत की, क्लायमॅक्स गाठण्याआधीच तुम्ही नखं चावायला लागाल.
(7 / 7)
रात अकेली है: या चित्रपटात लग्नाच्या रात्री श्रीमंत कुटुंबात एक खून होतो. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याला (नवाजुद्दीन सिद्दीकी) बोलावले जाते. चित्रपटाची कथा तुम्हाला सस्पेन्सच्या रोलर कोस्टर राईडवर घेऊन जाईल.