५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह बाजारात आलेल्या सॅमसंग एम सीरिजमधील या फोनमध्ये ६.६ फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळत आहे. तर, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश आहे.
पोको एम ६ प्रो 5G
पोको एम ६ प्रो 5G मध्ये ग्राहकांना ६.७९ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा मिळत आहे. तर, ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे.
रेडमी १३ सी मध्ये ग्राहकांना ६.७४ इंचाचा डिस्प्ले मिळतो. याफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा (५० मेगापिक्सल,२ मेगापिक्सल, २ मेगापिक्सल) सेटअप मिळत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्लेसह 5G कनेक्टिव्हिटी मिळत आहे. फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या दमदार बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जात आहे.