आजकाल सेल्फी कॅमेरे स्मार्टफोनचा एक आवश्यक भाग बनले आहेत. चांगले सेल्फी काढण्यासाठी लोक चांगला कॅमेरा असलेला फोन शोधत आहेत. अनेक उत्तम सेल्फी कॅमेरा असलेले स्मार्टफोन ३०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीतही खरेदी करता येतात.
मोटोरोला एज ५० प्रो 5G: मोटोरोला डिव्हाइसमध्ये ५० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि मागील पॅनलवर ५० मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ग्राहक हा फोन २९ हजार २०० रुपयांना ऑर्डर करू शकतात.
रेडमी नोट १४ प्रो: रेडमी स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. हा फोन २४ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात खरेदी करता येईल.
व्हिवो टी३ अल्ट्रा: वक्र डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनमध्ये ८० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५ हजार ५०० mAh बॅटरी मिळते. या फोनची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे.
रिअलमी १३ प्रो प्लस: स्टायलिश डिझाइनसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ३२ एमपी सेल्फी कॅमेरा आणि ५० एमपी+८ एमपी+५० एमपी मुख्य कॅमेरा सेटअप आहे. या 5G फोनची किंमत २६ हजार २२५ रुपये आहे.