ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज हिंदीमध्ये पाहण्यास उपलब्ध आहे. पण या सहा वेब सीरिजची कथा त्या सर्वांपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला मॅडनेस, सस्पेन्स आणि थ्रिलचा असा परिपूर्ण मनोरंजनाचा डोस मिळेल.
कँडी- या सीरिजची कहाणी रुद्रकुंडच्या शाळेत घडते, जिथे एकामागून एक खून होतात आणि प्रत्येकाचा संबंध रुद्रकुंडच्या रुद्र व्हॅली स्कूलशी जोडला जातो. तुम्ही ही ८ भागांची मालिका तुमच्या कुटुंबासह वूटवर पाहू शकता.
हसमुख- या सीरिज एका कॉमेडियनची कथा दाखवण्यात आली आहे, जो एक सीरियल किलर देखील आहे. ही ११ भागांची डार्क कॉमेडी आणि क्राईम सीरिज नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे.
इरु धृवम- या मर्डर मिस्ट्री वेब सीरिजमध्ये एका विक्षिप्त माणसाची कथा दाखवण्यात आली आहे, जो छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो आणि बदला घेण्यासाठी लोकांच्या डोळे काढून घेतो. ही सीरिज ९ भागांची आहे आणि तुम्ही ती सोनी लिव्हवर पाहू शकता.
प्रोजेक्ट ९१९१- सोनी लिव्हची वेब सीरिज 'प्रोजेक्ट १९१९' ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर अल्गोरिदम, बिहेव्हियर प्रेडिक्शन यावर आधारित आहे.
रहस्य रोमांच- या वेब सीरिजमध्ये तीन वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. या सीरिज एकूण १७ भाग आहेत आणि तुम्ही ही सीरिज एमएक्स प्लेयरवर हिंदीत पाहू शकता.