एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक तो पाहयला जाण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू वाचतात जेणेकरुन कथा कळेल किंवा मग त्या चित्रपटाला मिळालेले रेटिंग पाहातात. ज्या चित्रपटांना चांगले रेटिंग असते तो पाहण्साठी प्रेक्षक जातात. चला पाहूया IMDbने दिलेले टॉप रेटिंग दिलेले चित्रपट…
सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे टिम रॉबिंस आणि मॉर्गन फ्रीमॅन यांचा चित्रपट The Shawshank Redemption. चित्रपटाची कथा ही जेलमधील दोन तरुणांच्या भोवती फिरते.
'द गॉडफादर' हा चित्रपट या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटात न्यूयॉर्क शहरातील माफियाचे कुटुंब दाखवण्यात आले आहे.
जर तुम्हाला सुपर हिरो आवडत असतील तर द डार्क नाईट या चित्रपटाची कथा चांगली आहे. हा चित्रपट या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
12 एंग्री मॅन हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. एका न्यायाधिशाच्या भोवती या चित्रपटाची कथा फिरते.