जर, तुम्हाला कॉमेडी चित्रपट पाहण्याचा शौक असेल, तर तुम्ही हे बॉलिवूडचे कॉमेडी चित्रपट नक्कीच पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला सर्वाधिक आयएमडीबी रेटिंग असलेल्या टॉप ७ बॉलिवूड कॉमेडी चित्रपटांची नावे सांगणार आहोत. तुम्ही हे चित्रपट अजून पाहिले नसतील तर नक्की पहा.
या यादीत पहिले नाव आमिर खानच्या ‘३ इडियट्स’चे आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.४ आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत शर्मन जोशी आणि आर माधवनही दिसले होते. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा २०००मध्ये रिलीज झालेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.२ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर देखील पाहू शकता.
२००६मध्ये रिलीज झालेला ‘खोसला का घोसला’ हा चित्रपट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.२ आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
संजय दत्तचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट आजही लोकांना आवडतो. या चित्रपटात संजय दत्तसोबत अर्शद वारसीही दिसला होता. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
अक्षय कुमारचा ‘ओएमजी’ हा चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरून वाद झाला होता. मात्र, प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खानचा 'दिल चाहता है' या चित्रपटाच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.१ आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.