तुमचा दिवस वाईट गेला असेल किंवा इतर काही कारणांमुळे उदास वाटत असाल, विनोदी चित्रपट आणि वेब सीरिज हे यावर एक अद्भुत औषधासारख्या ठरतात. दु:ख विसरून काही क्षण हसायला कोणाला आवडत नाही? चला तर मग, जाणून घेऊया अशाच काही हलक्याफुलक्या कॉमेडी वेब सीरिजबद्दल…
पंचायत: ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर या मालिकेचे एकूण ३ सीझन रिलीज झाले आहेत आणि हे तिन्ही सीझन खूपच अप्रतिम आहेत. खेड्यापाड्यातील आणि शहरांच्या सामान्य जीवनावर आधारित विनोदांची आणि सामान्य माणसाच्या जीवनातील गुंतागुंत दाखवणारी ही सीरिज अप्रतिम आहे.
गुल्लक: ‘गुल्लक’ या सीरिजचे नाव नेहमीच काही अप्रतिम कॉमिक सीरिजमध्ये समाविष्ट केले जाईल. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाच्या हृदयाला भिडणारी ही सीरिज प्रत्येक सुख-दु:खात एकत्र राहून कुटुंब कसं पुढे जातं हे दाखवते.
मिसमॅच्ड: किशोरवयीन जीवनातील ही प्रेमकथा प्रत्येकाला आपल्या महाविद्यालयीन क्रश आणि बालपणीच्या प्रेमाची आठवण करून देईल. संगीत, रोमान्स आणि कॅम्पस ड्रामाने भरलेली ही सीरिज तुम्ही जरूर पहावी. ज्यामध्ये तुम्हाला हसण्याच्या आणि रडण्याच्या अनेक संधी मिळतील.
कॅम्पस बीट्स: कॉमेडी व्यतिरिक्त तुम्हाला डान्स आणि कॉलेज लाईफ ड्रामा आवडत असेल, तर ही मालिका तुमच्यासाठी आहे. ही सीरिज इतकी हिट होती की, तुम्ही इन्स्टा रीलमध्ये याचे काही सीन पाहिले असतील.
हॉस्टेल डेज: तुम्ही जर कधी वसतिगृहात राहिला असाल, तर तुम्हाला त्या काळातील समस्यां आणि गंमतीजमती नक्कीच आठवत असतील. त्या काळात तुम्ही खूप मजाही केली असेल. ‘हॉस्टेल डेज’ ही अशीच एक सीरिज आहे, जी तुमचा दिवस फ्रेश करण्यासाठी पुरेशी आहे.