मुंबईत लोकल रेल्वेनंतर प्रवाशी बेस्ट बसला प्राधान्य देतात. मुंबईकरांसाठी दुसरी रक्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसला आज दुपारच्या सुमारास भररस्त्यात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
(1 / 5)
मुंबईतील वांद्रे भागात बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस थांबवल्याने सर्व प्रवाशी सुखरुप बसमधून बाहेर पडले.
(2 / 5)
या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसून अग्निशमन दलाच्या जवानांकडून २ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले गेले.
(3 / 5)
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील एसव्ही रोड येथे बेस्ट बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांनी भीतीने आरडाओरडा केला. त्यामुळे बसमधील सर्व प्रवासी प्रसंगावधान राखत उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
(4 / 5)
बेस्ट बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यातच बसला आग लागल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली
(5 / 5)
या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. बसमध्ये २० ते ३० प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसात बेस्ट बसला अचानक आली लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.