अॅक्शनपट प्रेमींसाठी साऊथचे चित्रपट सर्वोत्तम पर्याय आहेत. कारण हॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त जर आपण काही देसी ॲक्शनबद्दल बोललो, तर साधारणपणे साऊथ चित्रपटांमध्ये चांगले ॲक्शन सीन पाहायला मिळतात. चला तर, मग जाणून घेऊया अशा काही अप्रतिम अॅक्शन फिल्म्सबद्दल, ज्या पाहून तुम्ही तुमचा मूड रिफ्रेश करू शकता.
सरकार : बॉलिवूडमध्ये ‘सरकार’ नावाचा चित्रपट अॅक्शन फिल्म्सचा बाप मानला जातो. पण, आज आपण साऊथच्या ‘सरकार’ चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. थलापती विजय अभिनीत हा चित्रपट एका व्यावसायिकाच्या राजकीय व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याबद्दल आहे. कथेला तिथून सुरुवात होते, जेव्हा हा व्यापारी आपले मत देण्यासाठी भारतात येतो आणि त्याला कळते की, त्याचे मत आधीच दुसऱ्याने टाकले आहे.
मास्टर : २०२१मध्ये रिलीज झालेल्या 'मास्टर' चित्रपटातही तुम्हाला फुल ऑन अॅक्शन पाहायला मिळेल. या तमिळ चित्रपटाची हिंदी आवृत्ती ओटीटीवर देखील पाहायला मिळेल. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट तुमचे भरपूर मनोरंजन करेल.
कैथी : लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कैथी’ या चित्रपटात तुम्हाला धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ही संपूर्ण कथा एका रात्रीत संपते, ज्यामध्ये एक गुन्हेगार काही सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला ट्रक घेऊन जातो. दरम्यान, एक ड्रग माफिया त्याच्यावर हल्ला करतो. संपूर्ण चित्रपटात तुम्हाला बॅक टू बॅक अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतील.
केजीएफ : जर तुम्ही साउथ चित्रपटांचे चाहते असाल आणि ‘केजीएफ’ सीरिज पाहिली नसेल, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. सुपरस्टार रॉकी भाई म्हणजेच यशचा हा चित्रपट रेकॉर्डब्रेक ठरला आहे. चित्रपटाचे दोन भाग आले असून आता चाहत्यांना तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे.
बाहुबली : राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' आणि 'बाहुबली - द कन्क्लूजन' हे चित्रपटही अॅक्शनपटांच्या रसिकांसाठी बनवले गेले आहेत. हे दोन्ही चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर बघायला मिळतील.