बेंगळुरूमधील जलसंकटामुळे केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावरच परिणाम झाला नाही तर सिंचनावरही परिणाम झाला आहे.
(PTI)बेंगळुरूमध्ये १४ हजार ७०० पैकी ६ हजार ९९७ बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या महिन्यांत येथील जलसंकट संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
(AFP)अधिकाऱ्यांनी २५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाण्याची तूट नोंदवली आहे. अपुरा पाऊस, भूगर्भातील कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच भूजलाचे अतिशोषण हे पाणी टंचाईचे प्रमुख कारण सांगितले जात आहे
(AFP)शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या बेंगळुरू पाणीपुरवठा विभागाच्या मते शहराला पाणीपुरवठा ५० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. कारण धरणात आता कमी पाणीराहिले असून पुढील काही दिवस पाण्याचे नियोजन करायचे आहे.
(AFP)बंगलोर पाणी पुरवठा मंडळ (BWSSB) ने सूचित केले की मध्यवर्ती भागात परिस्थिती व्यवस्थापित केली जाऊ शकते, शहराच्या बाहेरील भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर आहे.
(AFP)“पाणी कोणत्याही व्यक्तीचे नाही; ते प्रत्येकासाठी आहे. आम्ही वॉर रूम तयार करत आहोत. सर्व अधिकारी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. आम्ही पाण्याच्या टँकरची समान किंमतही निश्चित करू. पाणीपुरवठ्यासाठी ५५६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे,” असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.
(PTI)अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराला मार्च ते मे या कालावधीत अंदाजे आठ हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) पाण्याची आवश्यकता आहे, तरीही जलाशयांमध्ये केवळ ३४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.
(PTI)बंगळुरूमधील पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी, बंगळुरू पाणीपुरवठा मंडळ (BWSSB) फिल्टर बोअरवेल बसवण्याची आणि पुनर्संचयित तलावाच्या जवळ वॉटर प्लांट्स बांधण्याची योजना आखत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण चाचणीनंतर पाणी पुरवठा करण्यासाठी या सुविधा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
(PTI)अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेंगळुरूला दररोज २,१०० दशलक्ष लिटर (MLD) पिण्यायोग्य पाण्याची आवश्यकता आहे, त्यापैकी १४५० MLD कावेरी नदीतून येते. जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे.
(AFP)