पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या संरक्षण सिद्धतेचा वेळोवेळी आढावा घेत असतात. आज त्यांनी हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. तिथं त्यांनी ‘तेजस’ या लढाऊ विमानातून उड्डाण केलं.
तेजस विमानातील उड्डाणाचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. 'हा अनुभव अवर्णनीय होता. आपला देशात कुठल्याही क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकतो, हा माझा विश्वास आज आणखी वाढला. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि हल (HAL) यांना शुभेच्छा, असंही पंतप्रधानांनी सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'तेजस' विमान उड्डाणासाठी सज्ज झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनीही आपण तयार असल्याची खूण करताना उपस्थितांना थम्ब्स-अप केलं.