नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रोलाइट्स असतात. त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होतो.
नारळाच्या या गोड पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि लोह सारखी खनिजे असतात. या पाण्यात सर्वात कमी कॅलरी असतात. तसेच जराही चरबी नसते. त्यामुळे आहार संतुलित ठेवण्यास नारळ पाणी उपयोगी ठरते.
नारळ पाण्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पचनास मदत होते. बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. त्यातील बायोएक्टिव्ह एन्झाईम्स शरीराच्या चयापचयाला चालना देतात आणि संपूर्ण आरोग्य निरोगी ठेवतात.
पोटॅशियम आणि सोडियम हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. नारळ पाण्यामध्ये ते मुबलक प्रमाणावर असते. त्यामुळे अनेकदा खेळाडू हे नारळ पाणी पितात. तसेच थकवा दूर करण्यास देखील मदत करते.
नारळ पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, अमिनो ॲसिड आणि साइटोकिनिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याचे नियमित सेवन केल्याने शरीर संक्रमण आणि रोगांशी लढते.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी नारळ पाणी चांगले असते. त्यामधील हायड्रेटिंग गुणधर्म त्वचेची लवचिकता वाढवण्यास मदत करतात. केसातील कोंडा दूर करण्यासाठी नारळ पाणी मदत करते.