जेवणातील सुगंध वाढवण्यापासून ते आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत हिंगाचा वापर घरात मोठ्या अनेक प्रकारे केला जातो. हिंगामध्ये असलेले अँटीबैक्टीरियल आणि अँटीवायरल औषधी गुणधर्म गॅस, अपचन, लठ्ठपणा, मूळव्याध, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया हिंगाचे पाणी पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे…
हिंगाचे पाणी प्यायल्याने ब्लोटिंग कमी होते. हे पाणी पोट थंड ठेवते आणि तसेच शरिरात अॅसिड तयार होण्यापासून थांबवते.
मूळव्याध रुग्णांसाठी हिंगाचे पाणी खूप फायदेशीर आहे. हिंगाचे पाणी मल मऊ करते आणि शरीरातील हायड्रेशन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे मूळव्याध रुग्णांचा त्रास कमी होतो.
हिंगामुळे पचनक्रिया सुधारून फुगलेले पोट कमी होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास देखील मदत होते.