BAPS Hindu Temple In Abu Dhabi : पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी अबुधाबीमधील पहिले हिंदू मंदिर BAPS स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन केले. २७ एकर जागेवर पसरलेल्या या भव्यदिव्य मंदिराची ही छायाचित्रे पाहा.
(1 / 8)
अबुधाबी येथील स्वामी नारायण मंदिराच्या उद्घाटन समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पुजारी ब्रह्मविहारीदास स्वामी सोबत आहेत. हे UAE मधील पहिले पारंपरिक हिंदू दगडी मंदिर आहे. या BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी अबुधाबी येथे करण्यात आले.(AP)
(2 / 8)
संयुक्त अरब अमिरातील हे पहिलं हिंदू शैलीतील मंदिर आहे. हे मंदिर स्वामीनारायण संस्थेने संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे बांधल आहे. मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार असून,या मंदिराला पुढील एक हजार वर्षापर्यंत कुठलेही नुकसान होणार नाही.(Bloomberg)
(3 / 8)
अबुधाबीमध्ये नव्याने बांधलेल्या BAPS हिंदू मंदिराच्या आतील छताची प्रतिमा. या मंदिराच्या बांधकामात राजस्थानी गुलाबी संगमरवरी आणि पांढरा इटालियन संगमरवर वापरण्यात आला आहे.(Bloomberg)
(4 / 8)
अबुधाबी येथील BAPS हिंदू मंदिरासमोर महंत स्वामी महाराज आणि स्वामी महाराजांचे शिष्य. पश्चिम आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून, मुस्लिम देशातील हे भारतीय शैलीतील पहिलं मोठ मंदिर आहे.(PTI)
(5 / 8)
अबुधाबीमधील BAPS हिंदू मंदिरात विशेष पूजा करताना महिला. हे मंदिर १०८ फूट उंच, २६२ फूट लांब आणि १८० फूट रुंद आहे. (PTI)
(6 / 8)
मंदिर परिसरात एक मोठे ॲम्फीथिएटर, प्रार्थना कक्ष, एक गॅलरी, एक ग्रंथालय, थिमॅटिक गार्डन्स, एक फूड कोर्ट, गिफ्ट शॉप, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एक मजली इमारत आणि ५ हजार लोक सामावून घेऊ शकतील, असे दोन कम्युनिटी हॉल आहेत.(PTI)
(7 / 8)
अबुधाबी, UAE मध्ये नव्याने बांधलेल्या स्वामी नारायण मंदिराचे दृश्य. ५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तीव्र तापमानातही टिकाऊपणा जपणाऱ्या या मंदिराच्या दगडांची निवड यूएईकडून करण्यात आली आहे. (REUTERS)
(8 / 8)
मंदिरात दोन घुमट, सात शिखर आहेत. मंदिराची रचना वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. पीटीआयनुसार, प्रत्येक शिखरावर रामायण, शिवपुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ, भगवान स्वामीनारायण, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन करणारी कोरीवकामं आहेत.(AFP)