OTT Movies: काही कारणास्तव चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ न शकलेले हिंदी सिनेमे आता प्रेक्षकांना घर बसल्या पाहाता येणार आहेत. हे सिनेमे तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहू शकता.
(1 / 8)
चित्रपट निर्माते अनेक वेळा असे चित्रपट बनवतात ज्यांना एकतर सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळत नाही किंवा इतका विरोध होतो की चित्रपटावर बंदी घातली जाते. असे अनेक हिंदी चित्रपट आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने चित्रपटगृहांमध्ये बंदी घातली गेली होती, परंतू आज तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल…
(2 / 8)
१९९६ साली रिलीज झालेला शबाना आझमी आणि नंदिता दास यांचा चित्रपट 'फायर' ही एका लेस्बियन जोडप्याची कथा होती. हा विषय त्यावेळी इतका संवेदनशील होता की चित्रपट प्रदर्शित होऊ दिला गेला नाही. पण आज तुम्ही हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम आणि यूट्यूबवर पाहू शकता.
(3 / 8)
अनफ्रीडम
(4 / 8)
जॉन अब्राहम आणि लिसा रे यांचा 'वॉटर' हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा १९३८ साली बनारसमधील बालवधू आणि विधवांच्या स्थितीवर भाष्य करणारी आहे. चित्रपटाची कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे आणि तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
(5 / 8)
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'ब्लॅक फ्रायडे' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट आणि त्यातील आरोपींना पकडण्याचे प्रयत्न यावर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही डिस्नेप्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
(6 / 8)
किस्सा कुर्सी का
(7 / 8)
२००२ साली प्रदर्शित झालेल्या 'द पेंटेड हाउस' या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या दृश्यांमुळे त्यावर बंदी घालावी लागली होती. चित्रपटात अनेक प्रौढ दृश्ये आहेत ज्यामुळे त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आले. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.
(8 / 8)
'पांच' हा चित्रपट यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या क्राईम थ्रिलर चित्रपटावर 2003 मध्ये बंदी घालण्यात आली होती. लैंगिक दृश्ये, अंमली पदार्थांचे सेवन, गुन्हेगारी आणि रक्तपात यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.