अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या प्री-वेडिंग इव्हेंट्सची खूप चर्चा झाली होती आणि आता लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. जगभरातील सेलिब्रिटी या लग्नात परफॉर्म करत आहेत आणि आता एका रिपोर्टमध्ये बादशाहने संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी किती फी घेतली होती, त्याचा आकडा समोर आला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात अनेक सेलिब्रिटींनी परफॉर्म केले आणि संगीत सेरेमनी संस्मरणीय बनवली. गायकांच्या यादीमध्ये बॉलिवूड सुपरस्टार रॅपर बादशाहचाही समावेश आहे, ज्यांनी या कार्यक्रमात परफॉर्म केले आहे.
शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेल्या या इव्हेंटमध्ये बादशाहने करण उजालासोबत परफॉर्म केलं आणि एका रिपोर्टनुसार, बादशाहने या एका संध्याकाळी परफॉर्म करण्यासाठी ४ कोटी रुपये फी घेतली आहे.
करण आणि बादशाहचे या इव्हेंटमध्ये परफॉर्म करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बादशहाचा रॅप आणि त्याच्यासोबत करणचा स्वॅग एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला आहे. एका व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशल स्टेजवर दोघांना सपोर्ट करताना दिसला होता.
संगीत सोहळ्याच्या व्हिडीओमध्ये सारा अली खान बादशहासोबत हुक स्टेप्स करताना दिसली आहे. या सोहळ्यात बादशाह आणि करणव्यतिरिक्त जगभरातील सेलिब्रिटी परफॉर्म करण्यासाठी आले होते. सलमान खान, दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.