Tripti Dimri Bad Newz: तृप्ती डिमरी जुळ्या मुलांची आई होणार आहे. पण, दोन्ही मुलांचे वडील वेगळे असणार आहेत.
(1 / 5)
विक्की कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क स्टारर ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाच्या रिलीजची बातमी समोर आली आहे. ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये ‘ॲनिमल’ अभिनेत्री तृप्ती डिमरी, गर्भवती महिलेची भूमिका साकारताना दिसली आहे.
(2 / 5)
तर, अभिनेता विकी कौशल आणि एमी विर्कसोबत ती रोमान्स करताना देखील दिसणार आहे. या चित्रपटाची कथा अधिक मजेशीर असणार आहे, जी प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस देईल. अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही एका लहान मुलाभोवती फिरणाऱ्या कथानकावर असणार आहे,
(3 / 5)
पण, या चित्रपटात एक जबरदस्त ट्विस्ट आहे, जो खूप मजेशीर असणार आहे. रिपोर्टनुसार, तृप्ती या चित्रपटात जुळ्या मुलांची आई होणार आहे. पण, दोन्ही मुलांचे वडील वेगळे असणार आहेत. जुळ्या मुलांपैकी एक मुलगा विकीचा आणि दुसरा एमीचा असेल.
(4 / 5)
या चित्रपटाची ही कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट १९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशी अनोखी कथा याआधी हिंदी चित्रपटात कधी पाहायला मिळाली नव्हती. ‘बंदिश बँडीट’सारख्या म्युझिकल वेब सीरिजचे दिग्दर्शन करणारे आनंद तिवारी यांनी ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट तयार केला आहे.
(5 / 5)
या चित्रपटातील तिन्ही पात्रं प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. ‘सॅम बहादूर’सारख्या चित्रपटानंतर विकीला अशा हटके भूमिकेत पाहणे मजेशीर असणार आहे. ‘ॲनिमल’नंतर तृप्ती डिमरी देखील या हटके व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.