चक्र फुलाला इंग्रजीत ‘स्टार अनिस’ असेही म्हणतात, ज्याचा गरम मसाला म्हणून वापरला जातो. लोक त्याचा वापर बिर्याणी, आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी करतात. पण, हे चक्र फूल एक अतिशय गुणकारी औषध आहे. ज्याचा वापर तुम्ही सांधेदुखीपासून गॅस आणि ब्लोटिंगपर्यंतच्या समस्या सोडवण्यासाठी करू शकता.
आठ ते दहा चक्र फूल पाण्यात उकळून ते पाणी सकाळी प्या. त्यामुळे अनेक प्रकारच्या वैद्यकीय समस्यांपासून आराम मिळतो.
ज्या लोकांना जास्त प्रमाणात पोट फुगणे, गॅस तयार होणे यांचा त्रास होतो. त्यांनी चक्र फुलाचा चहा प्यायल्याने त्यांना आराम मिळू शकतो.
ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यांनी चक्र फुलापासून बनवलेल्या चहामध्ये मध मिसळून प्यावे. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि अँटीव्हायरल गुणधर्म हंगामी संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात.
बऱ्याचदा हंगामी संसर्गामुळे घशात दुखणे आणि श्लेष्मा तयार होणे सुरू होते. हा चहा प्यायल्याने घशात जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत होते. चक्रफुलाचे औषधी गुणधर्म फुफ्फुसातील जळजळ कमी करतात.
चक्र फुलातील सूज कमी करण्याच्या गुणधर्मामुळे सांधेदुखीतही मदत होते. चक्र फूल थोड्या प्रमाणात घेतल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.