दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला दिवाळीच्या खास मुहूर्तावर भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
(adobestock)आज आम्ही तुम्हाला IRCTCच्या एका अतिशय अप्रतिम टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत. या टूर पॅकेजअंतर्गत तुम्हाला अयोध्येत भगवान श्रीरामाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
(adobestock)रामायणानुसार, लंकापती रावणाचा वध करून प्रभू राम जेव्हा पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले तेव्हा संपूर्ण अयोध्या शहरात दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले.
तेव्हापासून हा दिवाळी सण साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत, दिवाळीच्या या खास प्रसंगी, तुम्ही IRCTC चे हे टूर पॅकेज चुकवू नका. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधाही मिळत आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
महत्वाचं म्हणजे IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे ''राम लल्ला दर्शन'' अयोध्या असं आहे. त्यांचा पॅकेज कोड NDR012 आहे. हे पॅकेज एकूण १ रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे.
हे IRCTC चे ट्रेन टूर पॅकेज आहे. यामध्ये तुमचा प्रवास ट्रेनने होईल. याशिवाय, तुम्हाला कॅबने इतर ठिकाणी नेले जाईल. IRCTC चे हे टूर पॅकेज २६ ऑक्टोबर २०२४ पासून दिल्लीमधून सुरू होणार आहे.
या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करताना तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. IRCTC हॉटेलसह तुमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करेल.
पैशांबाबत सांगायचं झालं तर, तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला १६,०२०रुपये भाडे द्यावे लागेल. दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ११,०४० रुपये भाडे आहे. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती भाडे ९,५१० रुपये आहे. अशाप्रकारे जास्त व्यक्ती असल्यास जास्त प्रमाणात सूट मिळणार हे नक्की आहे.