आज दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली गेली. प्राण प्रतिष्ठानंतर रामलल्लाचे फोटोही समोर आले आहेत. डोक्यावर सुवर्ण मुकूट, कपाळावर टिळा, दोन्ही हातात सुवर्ण धनुष्यबाण असलेल्या रामलल्लाची अद्भुत झलक दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गर्भगृहात मुख्य यजमानच्या रुपात पूजा अर्चना केली. त्यानंतर केवळ ८४ सेकंदाच्या शुभ मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा केली गेली. यावेळी आरएसएस प्रमुख मोहन भागवतही उपस्थित होते.
राम लल्लाच्या मूर्तीची उंची ४.२४ फूट आहे तर वजन २०० किलो आहे. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा शृंगारही खुपच सुंदर पद्धतीने केला आहे.