मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Avoid to Buy on Tuesdsy: मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, मंगळाच्या अशुभ प्रभावाने होऊ शकते नुकसान

Avoid to Buy on Tuesdsy: मंगळवारी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, मंगळाच्या अशुभ प्रभावाने होऊ शकते नुकसान

Aug 21, 2023 09:43 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • What Not To Buy On Tuesdsy: मंगळवार श्री हनुमान आणि मंगळ देवाला समर्पित आहे. काही वस्तू या दिवशी खरेदी करू नयेत. मंगळवारी या वस्तू घरी आणल्याने रामभक्त हनुमानाचा कोप होऊ शकतो आणि मंगळाचा अशुभ प्रभाव पडतो. चला जाणून घेऊया मंगळवारी कोणत्या वस्तू खरेदी करणे अशुभ आहे.

मंगळवार हा दिवस बजरंगबली आणि मंगळदेवाच्या पूजेला समर्पित असतो. असे मानले जाते की हनुमानाची पूजा केल्याने आणि मंगळवारी व्रत केल्यास अशुभ कर्मे देखील शुभ कर्मात बदलतात आणि व्यक्तीला यश प्राप्त होते.

(1 / 6)

काचेच्या वस्तू: मंगळवारी काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळा. असे मानले जाते की मंगळवारी काचेची वस्तू खरेदी केल्याने भगवान हनुमान नाराज होतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(2 / 6)

काळे कपडेः मंगळवारी काळे कपडे खरेदी करू नयेत. असे केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. याशिवाय या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. मंगळवारी लाल रंगाचे कपडे घालणे उत्तम मानले जाते.

(3 / 6)

मेकअपच्या वस्तू: महिलांनी मंगळवारी मेकअपच्या वस्तू खरेदी करू नयेत. असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने मंगळवारी ब्युटी प्रोडक्ट खरेदी केली तर यामुळे वैवाहिक जीवनात कटुता येईल. सौभाग्य वाढवण्यासाठी सोमवारी आणि शुक्रवारी मेकअपचे प्रोडक्ट खरेदी करणे सर्वोत्तम मानले जाते.

(4 / 6)

दुग्धजन्य पदार्थ: मंगळवारी बाहेरून मिठाई, बर्फी, रबडी असे दुग्धजन्य पदार्थ खरेदी करू नका. दूध किंवा पांढरा रंग चंद्राशी संबंधित आहे. चंद्र आणि मंगळ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. अशा स्थितीत मंगळवारी चंद्राशी संबंधित वस्तू खरेदी करणे किंवा दान केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव होऊ शकतो.

(5 / 6)

नवीन घर: मंगळवारी नवीन घर घेणे देखील शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की मंगळवारी नवीन घर खरेदी केल्याने घराच्या प्रमुखाचे आरोग्य खराब होते. या दिवशी घर खरेदी करण्याव्यतिरिक्त पायाभरणी, भूमिपूजन, नवीन घराचे बांधकाम सुरू करू नका.

(6 / 6)

WhatsApp channel

इतर गॅलरीज