एवोकॅडो हे फळ असे आहे जे फार कमी लोकांच्या खाण्यात येते. पण या फळाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे होतात. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर, पोटॅशियम सारखे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच अँटीऑक्सिडंट्स सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे चला जाणून घेऊया एवोकॅडो किती गुणकारी आहे.
हेल्दी फॅट्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे दोन्ही घटक एवोकॅडोमध्ये असतात. त्यामुळे डॉक्टर एवोकॅडो खाण्याचा सल्ला देतात.
एवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणावर फायबर असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी या फळाचे सेवन केले जाते. हे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचेवर चांगला ग्लो यावा यासाठी देखील एवोकॅडो खाल्ले जाते. कारण एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.