
धनतेरसपूर्वी एक दुर्मिळ योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ७५३ वर्षांनंतर धनतेरसपूर्वी एक दुर्मिळ महायोग येणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी गुरु पुष्य योगाबरोबरच अमृतसिद्धी, पारिजात, महालक्ष्मी योग, बुधादित्य योगही तयार होणार आहे. त्यामुळे अनेक राशींना फायदा होणार आहे.
धनतेरस किंवा धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे. तो दिवस खरेदीसाठी ओळखला जातो. या दिवशी सोन्यापासून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त असतो. धनतेरसचा शुभ मुहूर्त २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि ही शुभ तिथी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी संपेल. धनतेरसपूर्वी या ३ राशींना लाभाची संधी मिळेल.
वृषभ :
गुरु पुष्य योगासह महालक्ष्मी राजयोगामुळे वृषभ राशीच्या जातकांना लाभ होईल. करिअरच्या बाबतीत तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. पदोन्नती मिळू शकते. पगारात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातील. व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीमुळे तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो.
कन्या :
अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सुखाची भर पडू शकते. आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्वी अस्तित्वात असलेल्या समस्या आता दूर केल्या जातील.
तूळ -
जीवनाच्या अनेक पैलूंमधून आनंद मिळू शकतो. या काळात तुम्ही तुमच्या भविष्यासाठी खूप बचत करू शकता. अभ्यासाकडे थोडे झुकू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही सुवर्ण संधी आहे. कोणताही आजार असेल तर तो दूर होईल. या काळात तुम्ही सोने, चांदी सारख्या वस्तूंची खरेदी करू शकता.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



