ऑगस्ट महिना सुरू होत आहे. या महिन्यात बरीच मोठी संक्रमणे होणार आहेत. याच महिन्यात श्रावण महिनाही सुरू होत आहे. अशात या संक्रमणामुळे अनेक राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया ऑगस्ट महिन्यात कोणते प्रमुख ग्रह गोचर करत आहेत.
सोमवार ५ ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत जाणार आहे. यानंतर पुन्हा २२ ऑगस्टला बुध कर्क राशीत पूर्वगामी स्थितीत येईल.
१६ ऑगस्टला ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीत संक्रमण करेल. ग्रहांचा राजा सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीत संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी सूर्य हे संक्रमण करेल.
प्रेम आणि विलासाचा कारक ग्रह शुक्र रविवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी १ वाजून २४ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
२६ ऑगस्ट २०२४ रोजी, मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये संक्रमण करतो आहे. ऑगस्ट महिन्यात बुध, रवि, शुक्र आणि मंगळ यांचे शुभ-अशुभ बदल प्रत्येक राशीवर प्रभाव टाकतील. पण पुढील काही राशींना सांभाळून राहावे लागेल.
ऑगस्टमध्ये सिंह राशीमध्ये जास्तीत जास्त ग्रहांचे परिवर्तन होतांना दिसेल. सूर्य देखील सिंह राशीत भ्रमण करत आहे, तर ग्रहाचा राजकुमार बुध सिंह राशीत प्रतिगामी होईल. शुक्र सध्या सिंह राशीत आहे. यामुळे सिंह राशीच्या लोकांनी ऑगस्टमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप कठीण जाऊ शकतो. या महिन्यात व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांनी यावेळी आपले बोलणे गोड ठेवावे. तुमच्या बोलण्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. नम्रपणे बोला, कशाचीही घाईगडबड करू नका.
मीन-
मीन राशीच्या लोकांना या महिन्यात व्यवसायात अडचणी येऊ शकतात. काही नवीन काम सुरू करायचे असेल तर या महिन्यात थांबा. आता कोणतेही नवीन काम सुरू करू नका. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर काळजीपूर्वक किंवा तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)