२०२३ हे वर्ष बॉलिवूड कलाकारांसाठी अतिशय चांगले ठरले आहे. यंदाच्या वर्षात अनेक हिट चित्रपट आले. पण काही चित्रपट असे ठरले ज्यामध्ये नायकापेक्षा खलनायकांची जास्त चर्चा झाली. आता हे सिनेमे कोणते चला पाहूया.…
दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीच्या 'जवान' या चित्रपटाती अभिनेता विजय सेतुपतीच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’ या चित्रपटातील इमरान हाश्मीची खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती.
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील जया बच्चन यांची नकारात्मक भूमिका विशेष चर्चेत होती.
संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटातील प्राण ही खलनायकाची भूमिका विशेष गाजली. अभिनेता बॉबी देओल ही नकारात्मक भूमिका चांगली वठवली.