२०२४ या वर्षात फिल्म इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काहींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तर काहींचे प्रदीर्ध आजारामुळे. चला जाणून घेऊया या कलाकारांविषयी…
बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. दिल्लीमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गजल सम्राट पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी छोट्या पडद्यावरील अभिनेता ऋतुराज सिंहजे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.