मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  jejuri khandoba temple : श्री क्षेत्र जेजुरी गडावर खंडेरायाला आकर्षक फुलांची सजावट; पुष्पोत्सवाने सजला गाभारा; पाहा फोटो

jejuri khandoba temple : श्री क्षेत्र जेजुरी गडावर खंडेरायाला आकर्षक फुलांची सजावट; पुष्पोत्सवाने सजला गाभारा; पाहा फोटो

May 26, 2024 09:24 AM IST
  • twitter
  • twitter
  • jejuri khandoba temple : जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. विविध फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला असून येणाऱ्या भाविकांचे लक्ष ही फुले वेधून घेत आहेत.
जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट करण्यात आली आहे. विविध फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आला आहे. 
share
(1 / 6)

जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट केली जाते. 
share
(2 / 6)

श्री मार्तंड विजय ग्रंथामध्ये ‘श्रीं’च्या विविध पुजांचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. यामध्ये दवणा पूजा, भंडार पूजा, पुष्प पूजा आदी पुजांचा उल्लेख आहे. त्या आधारावरच कुलस्वामी खंडोबा मंदिरातील वंशपरंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी, वीर, कोळी, घडशी समाजाच्या वतीने ‘श्रीं’च्या विविध पूजा उत्सवाचे आयोजन केले जाते.
share
(3 / 6)

वैशाख महिन्यातील एका शनिवार आणि रविवारी ‘श्रीं’ना फुलांची सजावट आणि आरास केली जाते. यामध्ये वंशपरंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी यांच्यावतीने सातभाई, बारभाई, दिडभाई, आगलावे यांनी पुढाकार घेतला, तर त्यांना कदम, मोरे आणि लांघी यांनी पुष्पोत्सव साजरा करण्यास मदत केली.
share
(4 / 6)

या उत्सवामध्ये श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
share
(5 / 6)

जेजूरी गडावर शनिवारी आणि आज रविवारी मोठ्याप्रमाणात भाविक श्री खंडेरायांच्या दर्शनासाठी आले होते. फुलांची ही आरास पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. 
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज