ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला क्रूर आणि पापी ग्रह म्हटले आहे. शनीप्रमाणेच कुंडलीत राहू आणि केतूदेखील नकारात्मक स्थितीत असतील तर जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. राहू शुभ असेल तर ती व्यक्ती राजाप्रमाणे राहते. राजकारणात उच्च पद प्राप्त करते. परंतू राहू नकारात्मक स्थितीत असेल जीवनात अनेक वाईट घटना घडतात. जाणून घेऊया यासंबंधी सविस्तर.
राहू हा छाया ग्रह आहे. छाया आपल्या जीवनावर मोठा परिणाम करते. राहूचे गुण म्हणजे रोग, वैर आणि ऋण. राहू बलवान असेल तर व्यक्ती अत्यंत धार्मिक होते आणि राहू वाईट असेल तर तो त्याला अनेक अनैतिक कृत्यांमध्ये ढकलतो. त्यात रोगराई, कर्ज आणि व्यसन यांचा समावेश आहे.
कुंडलीतील इतर कोणत्याही ग्रहासोबत राहू विराजमान असेल तर त्याचाही त्या ग्रहावर अशुभ प्रभाव पडतो आणि अशुभ योग तयार होतो. उदाहरणार्थ, कुंडलीतील सूर्य आणि राहू च्या संयोगामुळे पितृदोष होतो, शनी आणि राहूच्या संयोगामुळे श्रापित दोष निर्माण होतो, चंद्र आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहदोष होतो, गुरु आणि राहूच्या संयोगामुळे गुरु चांडाल योग उद्भवतो.
वाईट राहूमुळे अनेक आजार होतात. उदाहरणार्थ, पोटाच्या समस्या, मायग्रेन, नातेसंबंध बिघडणे, गोंधळ, निर्णय घेण्यात अडचण येणे इत्यादी. याशिवाय आर्थिक नुकसान, लोकांशी समन्वयाचा अभाव, किरकोळ गोष्टींवर राग येणे, शिव्या देणे किंवा वाईट बोलणे, अपघात, मानहानी, अंमली पदार्थांचे व्यसन ही सर्व राहूची वाईट लक्षणे आहेत. असे लोक वाईट संभोगात अडकतात आणि कौटुंबिक मालमत्ता आणि वारसा देखील नष्ट करतात.
राहू मन विचलित करतो, म्हणून अशा लोकांनी योग आणि ध्यान करावे. दररोज भगवान शंकराची पूजा करा आणि 'ॐ नम: शिवाय' या मंत्राचा जप करा. भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने राहू शांत होतो. दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. विवाहित असाल तर सासरच्या मंडळींशी चांगले संबंध ठेवा. व्यसनापासून दूर राहा.