मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Asian Games 2023 : क्रिकेट संघ ते निखत झरीन! भारताला हे खेळाडू मिळवून देणार सुवर्णपदक

Asian Games 2023 : क्रिकेट संघ ते निखत झरीन! भारताला हे खेळाडू मिळवून देणार सुवर्णपदक

Sep 21, 2023 03:28 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Asian Games 2023 चे आयोजन चीनमधील हांगझोऊ येथे होत आहे. हे खेळ २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. २३ तारखेला हांगझोऊ येथे उद्घाटन समारंभ होणार आहे, ज्यामध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हे भारतीय संघाचे ध्वजवाहक असतील. 

यावेळी एकूण ६५५ भारतीय खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहेत. यात भालाफेकपटू नीरज चोप्रासह असे ५ भारतीय स्टार खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून देशाला सुवर्ण पदकाची आशा आहे. या यादीत महिला बॉक्सर निखत जरीन ही अव्वल स्थानावर आहे. 

(1 / 7)

नीरज चोप्राने २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही तो सुवर्ण पदकाचा दावेदार आहे. गेल्या वेळी त्याने जकार्ता गेम्समध्ये ८८.०६ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप, टोकियो ऑलिम्पिक आणि डायमंड लीगमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचा सर्वोत्तम थ्रो ८९.९४ मीटर आहे.

(2 / 7)

भारताची स्टार महिला बॉक्सर निखत जरीन ५० किलो वजनी गटात वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये चॅम्पियन ठरली आहे. आशियाई स्पर्धेत ती पहिल्यांदाच सहभागी होत असली तरी तिच्याकडून सुवर्णपदकाच्या पूर्ण अपेक्षा आहेत. २७ वर्षीय निखतने आशियाई क्रीडा स्पर्धा जिंकल्यास ती पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र ठरेल.

(3 / 7)

२०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने निराशा केली होती. त्यावेळी संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी भारतीय पुरुष हॉकी संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्यांच्याकडून सुवर्णपदकाची पूर्ण आशा आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघाला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.

(4 / 7)

भारतीय पुरुष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघ दोन्ही प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळत आहेत. पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे, तर महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. या दोन्ही संघांकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

(5 / 7)

बॅडमिंटनमध्ये भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. पुरुष दुहेरीत ही जागतिक क्रमवारीत नंबर तीनची जोडी आहे. त्यांनी गेल्या वर्षी इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावले होते. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. तर जागतिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.

(6 / 7)

world cup

(7 / 7)

world cup

WhatsApp channel

इतर गॅलरीज