Asia Cup Final: श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजयानंतर टीम इंडियाचे सेलिब्रेशन, पाहा फोटो
Asia Cup Final: आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले.
(1 / 6)
आशिया चषक २०२३ च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा १० विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. सर्वाधिक आशियाई विजेतेपदे जिंकणारा भारत एकमेव देश ठरला आहे. आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी जल्लोष केला.(AP)
(2 / 6)
या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या संघाने गुडघे टेकले, श्रीलंकेच्या संघाचा डाव अवघ्या १५. २ षटकात ५० धावांवर आटोपला. (PTI)
(3 / 6)
भारताच्या विजयात मोहम्मद सिराजचा सिंहाचा वाटा आहे. सिराजने अवघ्या १६ चेंडूत श्रीलंकेचा अर्धा संघ माघारी धाडला. या कामगिरीसह सिराजनं नव्या विक्रमाला गवसणी घातली असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ विकेट्स घेणारा तो गोलंदाज ठरला आहे.(AFP)
(4 / 6)
या सामन्यात २१ धावा खर्च करून ६ विकेट्स घेणारा मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.(AFP)
(5 / 6)
भारताकडून मोहम्मद सिराजने ६, हार्दिक पांड्याने ३ आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. भारताच्या वेगवान गोलंदाजीने श्रीलंकेन फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला १०० धावांचा टप्पाही गाठता आला नाही.(AP)
इतर गॅलरीज