मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणारे अभिनेता म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ओळखले जाते. अशोक सराफांनी मराठी सिनेसृष्टीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.
(instagram)'अशीही बनवाबनवी', 'पांडू हवालदार', 'धूमधडाका', 'आमच्यासारखे आम्हीच', 'एकापेक्षा एक' अशा एक ना अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
अशोक सराफांना सर्वजण प्रेमाने मामा असे संबोधतात. त्यामुळेच त्यांच्याबाबत प्रत्येक लहान-लहान गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात.
त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना एका गोष्टीचं नेहमीच कुतूहल वाटतं. ते म्हणजे मामांच्या हातात असलेली एक अंगठी. गेल्या ४८ वर्षांपासून मामांच्या हातात एक अंगठी आहे. ही अंगठी मामांनी फॅशन म्हणून घातलेली नाही तर यामागे फारच मोठं कारण आहे. अशोक सराफ यांच्यासाठी ही अंगठी अत्यंत महत्वाची आहे.
अशोक सराफ यांचा विजय लव्हेकर हा एक खास मित्र होता. त्याकाळात ते एक मेकअप आर्टिस्ट तसेच व्यवसायाने सोनार होते. १९७४ मध्ये ते एकदा अशोक मामांकडे आल्या आणि त्यांनी समोर काही अंगठ्या ठेवल्या.
त्यामधील कोणतीही एक अंगठी मामांना घ्यायला सांगितली. मामांनी एक अंगठी उचलून आपल्या हातात घातली. त्यावर एक सुंदर नटराज बनवण्यात आलं होतं.