मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ashadhi palkhi 2022माऊली नामाच्या जयघोषात पादुकांना नीरा स्रान; पहा क्षणचित्रे

Ashadhi palkhi 2022माऊली नामाच्या जयघोषात पादुकांना नीरा स्रान; पहा क्षणचित्रे

Jun 28, 2022 07:12 PM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • माऊली माऊली नामाचा जयघोष करीत, टाळ-म्रुदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मंगळवारी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यातआले. नीरा स्थानांतर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आपल्या वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊलींचा पालखी सोहळा सुरु करणाऱ्या हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला. 

 नीरा नगरीत माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. यानंतर सोहळा नीरा नदिच्या काठावरील नयनरम्य विसावास्थळी विसावला. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्त जमले होते. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्त जमले होते. 

नीरा पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी तळाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगालावुन माऊलींच्या पालखीतील पादुकांचे नतमस्तक होऊन दर्शन घेतले. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पढे तुतारी वादक सलामी देत होते, मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथ नीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

. 'माऊली माऊली' नामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पादुकांना पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दत्तघाटावर तसेच नदी तिरावर एकच गर्दी केली होती.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

 नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून वैभवी लवाजम्यासह सोहळ्याने साता-यातील लोणंद येथे प्रवेश केला. यावेळी साश्रू नयनांनी पालखी सोहळ्याला नीरा ग्रामस्थांनी निरोप दिला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

 नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून वैभवी लवाजम्यासह सोहळ्याने साता-यातील लोणंद येथे प्रवेश केला. यावेळी साश्रू नयनांनी पालखी सोहळ्याला नीरा ग्रामस्थांनी निरोप दिला.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज