पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव! यंदा ‘झी टॉकीज’च्या विशेष आयोजनामुळे अधिकच रंगतदार झाली आहे. झी टॉकीजने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी १२ फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वारीला एक विशेष आकर्षण मिळाले आहे.
वारीच्या २१ दिवसांच्या प्रवासात झी टॉकीजची टीम ३०० दिंड्यांसह सहभागी झाली. पण झी टॉकीज यंदा वारीला आणखी एक अनोखी आयडिया घेऊन आली. त्यांनी प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी बनवण्याचे नियोजन केले आणि सर्व वारकऱ्यांनी केलेल्या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्रे तयार झाली आहेत.
वारकऱ्यांनी तयार केलेली ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहे, ज्यामुळे वारीचे धार्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे. गेल्या वर्षी वाहिनीने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता. तर, यंदा ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास करणार आहेत. या वर्षीची वारी २९ जून ते १७ जुलै दरम्यान सुरू होती.
या कॅन्टर ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनाही माऊलींचे दर्शन घेतले. अभिनेता-अँकर अमित रेकीने तिथे उपस्थित राहून सेलिब्रिटींसोबत संवाद साधला आणि वारकऱ्यांशी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा केली.