आज अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या रंगात रंगला आहे. सगळीकडे एकच जयघोष सुरू आहे. विठ्ठल नामात सगळेच दंग झाले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने, सूत्रसंचालन आणि कवितांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सध्या कामाच्या निमित्ताने परदेशात आहे. दरवर्षी अतिशय भक्तिभावानं आषाढी एकादशी साजरा करणारा संकर्षण यावर्षी मात्र चांगलाच विचारात पडला होता.
कामाच्या निमित्ताने बाहेर असताना आषाढी एकादशी कशी साजरी करायची? हा उपास तरी कसा करायचा असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र विठुरायाने त्याचा हा प्रश्न सोडवला. परदेशात असतानाही अतिशय सुंदररित्या त्याने आषाढी एकादशी साजरी केली आहे. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत, त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्ट मधून त्याने आपल्या परदेशातील आषाढी एकादशी साजरा करण्याच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा स्पृहा जोशी सोबत कवितांचे कार्यक्रम करतो.
‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमासाठी तो सध्या परदेशात आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संघर्ष आपल्या मायदेशाला आणि विठुरायाला खूपच मिस करत होता. या परक्या देशात आपला विठुराय कसा आपल्याला दिसणार, या विचारांनी चिंतेत असलेल्या संकर्षणची इच्छा साक्षात विठुरायानेच पूर्ण केली.
परदेशात असलेल्या संकर्षण कऱ्हाडेला तिथेच विठ्ठल पूजेचा मान मिळाला आहे. संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अमेरिकेतील आषाढीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. यासोबतच त्याने एक पोस्ट देखील लिहिली आहे.
या पोस्टमध्ये संकर्षणने लिहिले की, ‘ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला भारतात नाहीये…सारखं मनांत वाटत होतं की “दर्शन कुठे घ्यावं… ??? उपवास कसा करावा ??? …” पण अमेरिकेत प्रयोग करायला आलो ऑस्टिनमध्ये… आणि तिथल्या मंडळाने प्रयोग सुसुरू करायच्या आधी विचारलं की, “आम्ही दर वर्षी पांडूरंगाची पूजा करतो, दिंडी आयोजित करतो… तर तुम्ही पुजेचा मान घ्याल का….?” मला असं वाटलं की, विठ्ठलानेच साद घातली…. “विठ्ठलाची हाक जोवर वैंकुठातून येत नाही.. कित्तीही ठरवा तुम्ही, पाऊल पंढरीकडे जात नाही.. लाख्खो पाऊलं चालून, जेंव्हा भेट ऊराऊरी होते.. पांडूरंग करतो स्वागत , आणि तेंव्हा खरी वारी होते…” विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल….!!!!