पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव, यंदा झी टॉकीजच्या विशेष आयोजनामुळे अधिकच रंगतदार होणार आहे. वाहिनीच्या वतीने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी १२ फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वारीला एक विशेष आकर्षण मिळणार आहे.
वारीच्या २१ दिवसांच्या प्रवासात ‘झी टॉकीज’ची टीम ३०० दिंड्यांसह सहभागी होणार आहे. पण, यंदा वारीला आणखी एक अनोखी आयडिया करण्यात आली आहे. त्यांनी प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी बनवण्याचे नियोजन केले आहे. ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहे, ज्यामुळे वारीचे धार्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे.
या उपक्रमासोबतच माऊलींची वारीही यंदा अधिक रंगतदार होणार आहे. माऊलींच्या वारीतली विठोबा-रुक्मिणीच्या मूर्तींसाठी वस्त्र बनवण्याचा उपक्रनामामुळे भक्तांना श्रमदान करण्याची संधी मिळणार असून, त्यामुळे भक्तांची श्रद्धा आणि भक्ती अधिक वृद्धिंगत होणार आहे.
गेल्या वर्षी झी टॉकीजने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता, तर यंदा ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास करणार आहेत. या वर्षीची वारी २९ जून ते १७ जुलै दरम्यान होणार आहे.
या कॅन्टर ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. अभिनेता-अँकर अमित रेकीदेखील तिथे उपस्थित राहून सेलिब्रिटींसोबत संवाद साधणार आहेत आणि वारकऱ्यांशी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा करणार आहेत. या नवकल्पनाशील उपक्रमामुळे वारीची धमाल आणखी वाढणार आहे. त्यामुळे यंदाची वारी अधिक उत्साहपूर्ण, रंगतदार आणि विशेष ठरणार आहे.