मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ashadha Gupta Navratri : आषाढ गुप्त नवरात्रीला करा या सोप्या गोष्टी, सुख सोभाग्याची होईल प्राप्ती

Ashadha Gupta Navratri : आषाढ गुप्त नवरात्रीला करा या सोप्या गोष्टी, सुख सोभाग्याची होईल प्राप्ती

Jul 02, 2024 03:58 PM IST
  • twitter
  • twitter
Ashadha Gupta Navratri 2024 : यावर्षी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र शनिवार, ६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे. असे म्हटले जाते की, जे लोक या नऊ दिवसांमध्ये कडक उपवास करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. तसेच देवीच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व समस्या दूर होतात, चला जाणून घेऊया त्याबद्दल.  
गुप्त नवरात्रीचा सण देवीच्या भक्तांसाठी खूप खास असतो. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र लवकरच सुरू होत आहे. या दरम्यान लोक देवी दुर्गाच्या १० महाविद्यांची पूजा करतात. असे मानले जाते की देवीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते. तसेच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
share
(1 / 5)

धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीला खूप महत्त्व आहे. वर्षात चार नवरात्र येतात. ज्यामध्ये भाविक आश्विन महिन्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरे करतात. त्यांना प्रकट नवरात्री म्हणतात. तर माघ आणि आषाढमध्ये येणाऱ्या नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हणतात. 
share
(2 / 5)

आषाढ गुप्त नवरात्रीला आर्थिक भरभराटीसाठी हे उपाय करा : गुप्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अख्खे तांदूळ आणि कवड्या लाल कापडात बांधा आणि घरात जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवा. यासोबतच नवरात्रीचे नऊ दिवस त्याची पूजा करावी. त्यानंतर व्रताच्या शेवटच्या दिवशी ते आपल्या अंगणातील मातीत पुरून द्यावे. जर तुम्ही हा मार्ग अवलंबला तर तुमच्या घरात पैशांची चणचण भासणार नाही.
share
(3 / 5)

आषाढ गुप्त नवरात्रीत नऊ दिवस देवी दुर्गाच्या चरणी कमळाची फुले अर्पण करावीत. त्यासोबत देवीच्या वैदिक मंत्रांचा जप करा. त्यामुळे देवी प्रसन्न होते. त्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार नाही.
share
(4 / 5)

आषाढ गुप्त नवरात्र तिथी आणि शुभ मुहूर्त: हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र शनिवार, ६ जुलै २०२४ पासून सुरू होणार आहे . सोमवार, १५ जुलै २०२४ रोजी संपणार आहे . कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त ६ जुलै रोजी सकाळी ५ वाजून ११ मिनिटांपासून ते ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत आहे.
share
(5 / 5)

इतर गॅलरीज