(8 / 9)पत्रकार परिषदेतील शेवटचा प्रश्न विचारल्यानंतर गांगुली म्हणाला होता, की "मी जाण्यापूर्वी फक्त एक शेवटची गोष्ट सांगू इच्छितो, ही माझी शेवटची मालिका असणार आहे. मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इथे येण्यापूर्वी मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं. हे ४ कसोटी सामने माझे शेवटचे असतील आणि आशा आहे की आम्ही विजयी कामगिरी करू. याच्या दोन दिवसांनंतर त्याने कबूल केले की, "वारंवार अपमानित होऊन कंटाळल्यामुळे आपण निवृत्तीचा निर्णय घेतला. "जर तुमच्या डोक्यावर सतत बंदूक असेल, तर तुम्ही हे किती दिवस सहन कराल? मी भारताकडून ४०० सामने खेळलो आहे. मी केवळ एका मालिकेत खराब खेळलो आहे. पण तरीही प्रत्येक टॉम, डिक आणि हॅरी संघात खेळत आहेत.