गाझा येथे इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिकारी आणि भारतीय लष्कराचे निर्वृत्त कर्नल वैभव अनिल काळे यांच्या पार्थिवावर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) धोबीघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू आणि लष्करातील दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पांजली अर्पण करून शोक व्यक्त केला. कर्नल काळे त्यांच्या मागे आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. या पुणे पोलिसांच्या पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, ब्रिगेडियर राजेश गायकवाड, सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लष्करी अधिकारी, शासकीय अधिकारी आणि सेवानिवृत्त सैन्यातील दिग्गजांनी काळे यांना श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला.
शासकीय कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत संस्कार करण्यात आले. यावेळी नॅशनल डिफेन्स अकादमीतील (NDA) त्यांच्या अभ्यासक्रमाचे काही मित्र देखील या वेळी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. वैभव काले हे देशसेवेसाठी तत्पर असलेले आणि मानवतावादी दृष्टीकोण असलेले एक तत्पर अधिकारी म्हणून त्यांच्याबद्दल विचार व्यक्त केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांना यावेळी मानवंदना वाहिली.
मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले अनिल काळे (वय ४६) हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका मोहिमेत जात असतांना पॅलेस्टाईनमधील गाझा येथील रफाह येथे त्यांच्या ताफ्यावर इस्रायलच्या लष्कराने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
ते काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले होते. भारतीय लष्करातून कर्नल पदावरून निवृत्त झालेले वैभव काळे हे तीन आठवड्यांपूर्वी एप्रिल २०२४ मध्ये रोजी संयुक्त राष्ट्र संघाचे सुरक्षा सेवा समन्वयक अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते.
"वैभव काळे हे कायम आनंदी असायचे. त्यांचा दृष्टीकोण सकारात्मक होता. त्यांचा मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांचे अनेक मित्र होते. आम्ही एनडीएत असतांना अनेक वेळा रगडा खाल्ला. आम्ही एकत्रित पणे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत कॅडेट असतांना त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्हाला त्याची उणीव कायम जाणवेल असेही ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नहून आलेले चुलत भाऊ हर्षद काळे यांनी वैभव काळे यांच्या सोबत त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
“आम्ही अनेक गोष्टी एकत्र करत होतो, मग ती लहान असो वा मोठी. माझ्या भावाला लहानपणापासून लष्करात जायचे होते. त्यामुळे तो भारतीय लष्करात सामील झाला. यानंतर तो निवृत्त झाला. मात्र, मानवीहितासाठी त्याला काम करायचे होते. त्यामुळे तो संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवतावादी मोहिमात सहभागी झाला होता. यामुळे त्याने संयुक्त राष्ट्र संघात नोकरी स्वीकारली.
आम्ही लहानपणी नवरात्री व इतर सण एकत्र साजरे करायचो. तो संयुक्त राष्ट्र संघाच्या मोहिमेवर असतांना कर्मचाऱ्यांना सुरक्षित नेन्यासतही चिलखती वाहनातून जात असतांना त्यांच्यावर हल्ला झाला. संयुक्त राष्ट्र संघाने त्याच्या मृत्यूची चौकशी करून खरे कारंन आम्हाला सांगायला हवे असे ते म्हणाले.
माजी लष्करी अधिकाऱ्याच्या नातेवाईक स्वाती काळे म्हणाल्या, “ते माझे मेहुणे होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अप्रतिम होते. ते राष्ट्रहितासाठी कटिबद्ध होते आणि अत्यंत कष्टाळू व्यक्ती होते.