
अर्जेंटिनाच्या या अप्रतिम विजयानंतर रस्त्यांवर अर्जेंटिनाचे झेंडे, निळ्या जर्सीतील लोकांची गर्दी आणि 'मेस्सी-मेस्सी'चा नाद आकाशात घुमला.
(AFP)उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० असा विजय मिळवल्यानंतर हे दृश्य देशातील जवळपास प्रत्येक शहरात पाहायला मिळाले.
(Reuters)सामन्यानंतर फुटबॉलसाठी ठार वेडा असलेला हा देश कधीही न संपणाऱ्या उत्सवात बुडाला. राजधानी ब्युनोस आयर्समध्ये सामना संपताच लोकांनी रस्त्यावर गर्दी केली. संघाची जर्सी घातलेल्या लोकांच्या हातात देशाचा ध्वज आणि ओठांवर राष्ट्रगीत होते. एवढेच नाही तर अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू मॅराडोनाच्या घरी जाऊन लोकांनी आनंदोत्सव साजरा केला.
संघाच्या या शानदार कामगिरीमुळे आर्थिक अस्थिरतेचा सामना करणाऱ्या या देशातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाकडून अनपेक्षित पराभव झाल्यानंतर सलग विजयांची नोंद करत संघाने अंतिम फेरी गाठली आहे.
(Reuters)अर्जेंटिनामधील चलनवाढीचा दर दरवर्षी सुमारे १०० टक्के आहे आणि देशातील दहापैकी चार लोक गरिबीत जगत आहेत. अभिनेत्री लैला डेस्मारी म्हणाली, 'आम्ही सर्वजण रोमांचित आहोत. खूप वर्षांनी आम्हाला एवढा आनंद मिळाला. हा अनुभव सुंदर आहे. पुढचे काही दिवस किती चांगले असतील हे सांगता येत नाही.
(AP)मेस्सीने ३३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यावर पालेरमो शहरातील पारंपारिक कॅफेमध्ये शांत बसलेल्या जमावाने अचानक जल्लोष केला. यावेळी काही चाहत्यांनी लोटांगण घालत 'मेस्सी, मेस्सी, मेस्सी'चे नारे दिले. तर तेवढ्यात गर्दीतून एकजण म्हणाला, 'आम्ही मेस्सीचा हात धरून जग जिंकू.'

