(2 / 5)आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी स्वतःहून त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली आहे. या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, की 'अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने, आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देत आहोत. १५ फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक मुलगा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकाय (Akaay) याचा जन्म झाला. या काळात आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. सोबतच आम्हाला प्रायव्हसी देण्याची मागणीही करत आहोत."