अनुष्का शर्मा, अथियापासून ते हेजल कीचपर्यंत अशा अनेक बॉलिवूड सुंदरी आहेत, ज्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसोडून क्रिकेटर्सशी लग्न केले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अभिनेते सोडून क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधली.
अनुष्का शर्मा-विराट कोहली : २०१७मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केले होते. विराट आणि अनुष्काला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
अथिया शेट्टी-केएल राहुल : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने २०२३मध्ये भारतीय फलंदाज एल राहुलसोबत लग्न केले. लग्ना आधी अथियाने काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गीता बसरा-हरभजन सिंह : अभिनेत्री गीता बसरा हिने २०१५मध्ये माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंहसोबत सात फेरे घेतले.
हेजल कीच-युवराज सिंह : अभिनेत्री हेजल कीच आतापर्यंत फार कमी चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने २०१६ मध्ये माजी भारतीय अष्टपैलू फलंदाज युवराज सिंहसोबत लग्न केले.
सागरिका घाटगे-झहीर खान : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री सागरिका घाटगे हिने२०१७मध्ये माजी भारतीय वेगवान गोलंदाज झहीर खानसोबत लग्न केले.