तुम्हाला माहित आहे का अनुष्का शर्मा, रणवीर सिंग आणि बॉलिवूडमधील इतर काही टॉप कलाकारांनी करिअरच्या सुरुवातीला लूकवरुन हिणवण्यात आले होते.
(1 / 8)
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना प्रत्येक कलाकाराला संघर्ष हा करावाच लागतो. काही कलाकारांना यश अगदी सहज मिळते तर काहींना मेहत घ्यावी लागते. काही कलाकारांना तर त्यांच्या लूकवरुन हिनवण्यात आले होते. आता हे कलाकार कोणते चला जाणून घेऊया…
(2 / 8)
वायआरएफचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी अभिनेत्री अनुष्का शर्माला, 'ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे पण दिसायला सुंदर नाही' असे म्हटले होते. अनुष्काने कॉफी विथ करण या शोमध्ये याविषयी खुलासा केला होता.
(3 / 8)
अभिनेता रणवीर सिंगने देखील करिअरच्या सुरुवातील लूकवरुन हिणवण्यात आल्याचे सांगितले होते. आदित्य चोप्राने त्याला, 'तू दिसायला इतका चांगला नाहीस म्हणून सर्वांशी खूप चांगला वागतोस' असे म्हटले होते.
(4 / 8)
बाजीगर आणि डरमध्ये खलनायक किंवा अँटी हिरो अवतारात साकारल्यानंतर शाहरुख खान प्रकाशझोतात आला होता. एकदा त्याने खुलासा केला होता की एका दिग्दर्शकाने त्याला सामान्य आणि कुरूप दिसतो म्हणून सुनावले होते.
(5 / 8)
अभिनेत्री विद्या बालनला नेहमीच तिच्या वजनावरुन ऐकावे लागले आहे. एका निर्मात्याने तर विद्याला ती सुंदर दिसत नाही म्हणून चित्रपटातून रिपलेस केले होते.
(6 / 8)
अभिनेत्री तापसी पन्नूला देखील करिअरच्या सुरुवातील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिला दिग्दर्शकांनी तुझे नाक सरळ नाही, केस कुरळे आहेत. तुला आम्ही चित्रपटात घेऊ शकत नाही असे म्हटले होते.
(7 / 8)
अभिनेत्री रिचा चड्ढाने देखील तिचा अनुभव सांगितला होता. तिला ग्लॅमरस दिसत नाही असे म्हणून निर्मात्याने हिणवले होते.(Raju Shinde)
(8 / 8)
राजकुमार रावने एकदा म्हटले होते की, लूकमुळे त्याला मुख्य भूमिका मिळाल्या नाहीत.